




Public Works Division No.2, Thane
मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून ठाणे जिल्हा या नगरीशी जोडून असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या त्यास अनन्य साधारण महत्व आहे. अशा प्रगत नगरीत महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्याचे स्थान हे साधारणताः वायव्य दिशेस असून ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेस नाशिक व अहमदनगर जिल्हे आहेत. दक्षिणेस पुणे जिल्हा आहे. नेऋत्येस मुंबई उपनगर जिल्हा आहे. पच्छीमेस अरबी समुद्र आहे. तर जिल्ह्याच्या उत्तरेस गुजरात राज्य व दादर नगर हवेली हे केंद्र शासीत प्रदेश आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात, ठाणे सा. बा. मंडळ, ठाणे, स्टेशन रोड, ठाणे (पच्छिम) - ४०० ६०१ या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महत्वाच्या प्रशासकीय इमारतीत सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ ठाणे कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयाचे कार्यकक्षेत जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, शहापुर व मुरबाड़ तालुक्यातील शाशकीय इमारती, रस्ते व पुल यांची नविन बांधकामे करणे तसेच देखबाल दुरुस्ती करणे ही कामे आहेत
शहापूर तालुक्यातील जैन धर्माचे मानस मंदिर तसेच माहुली किल्ला ही धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट हे पर्यटन स्थळ आहे व म्हसा हे धार्मिक क्षेत्र असून दर वर्षी महादेवाची मोठी यात्रा भरते. अंबरनाथ तालुक्यातील शिवमंदिर प्रसिद्द असून दर सोमवारी व शिवरात्रीला भाविकांची मोठी वर्दळ असते. कल्याण तालुक्यातील हाजीमलंग दर्गा हे सर्व धर्माच्या भावीकांसाठी श्रद्धास्थान आहे. या गडावर भाविकांना जाण्यायेण्यासाठी या विभागामार्फत खाजगीकरणांतर्गत 'फ्यूनिक्यूलर ट्रोली ' चा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ ठाणे अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान खालीलप्रमाणे आहे.
१. शहापुर - २५५६ मि. मी.
२. उल्हासनगर - २३६४ मि. मी.
३. अंबरनाथ - २३६४ मि. मी.
४. मुरबाड - २३२८ मि. मी.
Latest Updates
Related Links
- www.maharashtra.gov.in
- www.pwd.maharashtra.gov.in
- www.mahapwd.com
- Government Resolution
- P.W. Circle, Thane
- P.W. Palghar
- P.W. Jawhar
- R.P. Konkan Bhavan
- www.pwdthane.org